उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविला उपक्रम
उरण दि. ६ (विठ्ठल ममताबादे ) : विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे आणि महसूल विभाग उरण यांच्या सहकार्याने दिनांक 05/11/2022 रोजी दुंबा ची कातकरी वाडी जासई, कोल्हापूर कातकरी वाडी चानजे, लिंबाची कातकरी वाडी , डाउर नगर कातकरी वाडी उरण येथे सर्व कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
या वाटप कार्यक्रमास कामगार नेते भाई संतोष घरत राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ RMBKS जासई, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी हे उपस्थित होते.
जातीचें दाखले वाटप केल्यानंतर कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. उरण सामाजिक संस्थेचे आदिवासी लोकांसाठी केलेल्या मागील दोन वर्षाचे काम पाहून विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी असे प्रामाणिक काम रायगड जिल्ह्यातील प्रत्येक वाडीवर होण्या करीता उरण सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व वाड्यांवर जातीचे दाखले काढण्याचे कॅम्प घेण्यासाठी विनंती केली असून तसे स्पष्ट आदेश सर्व उप विभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत. प्रा. राजेंद्र मढवी यांनी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे आणि सर्व मंडळ अधिकारी,आदिवासी विकास निरीक्षक, तलाठी , महसूल विभागाची टीम यांचे आभार मानले आहेत.




















