शिव प्रतिष्ठान व समस्त रत्नागिरीकर यांच्यातर्फे दीपोत्सव

माजी आमदार बाळासाहेब माने यांची उपस्थिती

रत्नागिरी (सुरेश सप्रे) : त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून शिव प्रतिष्ठान व समस्त रत्नागिरीकर नागरिक मिळून मारुती मंदिर येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1000 दिव्यांची आरास करण्यात आली होती. या दीपोत्सवातील पहिला दीप भाजपचे नेते माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करण्यात आला.

यावेळी शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश दादा नलावडे, व प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते व रत्नागिरीकर नागरिक adv.अमित काटे,सिद्धेश सावंत देसाई, तेजस सावंत यश डोंगरे, अक्षत सावंत ,जयदीप साळवी, युवराज मिहीर माने व अनेक रत्नागिरीकर पुरुष व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते पहिला दीप प्रज्वलित करताना अनेक रत्नागिरी कर सुजाण नागरिकांनी, ज्या प्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरयू नदीकीनारी दीपोत्सव साजरा केला तसा त्यांच्याच पक्षाचे अनुयायी माजी आमदार बाळासाहेब माने यांनी रत्नागिरीत साजरा केला, अशा अनेकांच्या तोंडून प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. या दरम्यान मारुती मंदिर सर्कलमधील शिवसृष्टीचे सौंदर्य खूपच आकर्षित करत होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE