आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रायगडची सणसणीत ‘किक’!

आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा ; रायगड जिल्हयातील पनवेल, पेणसह माणगावच्या खेळाडूंचा दणदणीत विजय

उरण दि. ८ (विठ्ठल ममताबादे ) : दिल्ली येथे 2 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दुसरी ओपन इंडियन आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून  अभिनेत्री रितिका सिंग सालाखडूस चित्रपट व रोमिओ देसा(क्रॉटिया)चेअरमन टेकनिकल कमिटी वाको.युरी लक्टिकोव(इस्टोनिया)चेअरमन रेफ्री कमिटी रिंग स्पोर्ट्स वाको यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेत 3 देश व 800 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.  पनवेल, पेण व माणगाव तालुक्यातील 4 खेळाडूंनी यात सहभाग घेतला व चमकदार कामगिरी दाखवत विजयी झाले. 

त्याची नावे खालील प्रमाणे

  सौम्या पिंपळे – 2 सुवर्ण पदक

  ऋग्वेद जेधे – 1 सुवर्ण,1 कास्य.

  अस्मि गुरव – 1 सुवर्ण पदक.

  केदार खांबे – 1 कास्य पदक.

   महाराष्ट्र राज्याच्या टीमला अध्यक्ष निलेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.भारताचे कोच जयेश चोगले तसेंच अध्यक्ष अम्याचुअर किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांनी मार्गदर्श केले.

युथ कराटे स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र पेण क्लासच्या खेळाडूंचे प्रशिक्षक संतोष मोकल सर,विकास सर,विजय सर,दिपक सर,मिलन सर, योगेश सर, मंदार चवळकर सर ,कु.दीक्षा जैन , प्रगती मॅडम, तसेच शुभम सर ,प्रीतम सर ,कंकेश सर ,कमलाकर सर, अभिषेक सर ,अजय सर, वैभव राहटे यांचे व खेळाडूंचे अभिनंदन  किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांनी केले व सर्वत्र पनवेल व रायगड जिल्ह्यात विजयी खेळाडूंवर कौतुकाचे व अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE