‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘एक दीप हिंदू राष्ट्र स्थापनेसाठीही प्रज्वलित करा’, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने सर्वत्र च्या हिंदूंना केले होते. त्याला रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दीप लावून हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना करत, ठीकठिकाणच्या हिंदूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दापोली येथीलश्रीचंडिका मंदिर, लाडघर येथे हिंदूत्वनिष्ठांनी सामूहिकरित्या दीप लावून प्रार्थना केली. ह.भ.प.श्री. कालेकर महाराज यांनी स्वगृही परिवारासह दीप प्रज्वलित करून हिंदू राष्ट्रासाठी प्रार्थना केली. तसेच समाज मंदिर पार्था देवी, वारे बुवा मंदिर मळे, आणि आगर वायंगणी गावचे उपसरपंच संतोष आंबेकर यांनी त्याचप्रमाणे एका स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिकपणे दीप लावले. लांजा येथील धनी केदारलिंग मंदिर, आसगे येथील धर्मप्रेमींनी,तसेच चव्हाटा मंदिर, लांजा चे विश्वस्त श्री. अभय बामणे यांच्यासह ५४ हिंदुत्वनिष्ठांनी ठिकठिकाणी सामूहिक रित्या प्रार्थना करत दीप प्रज्वलन केले.

राजापूर येथील हिंदुत्वनिष्ठ व्यापारी श्री. संदीप देसाई, श्री. अविनाश पाटणकर, श्री. विनायक सावंत यांच्यासह ओंकार मित्र मंडळ राजापूरचे अध्यक्ष श्री. विवेक गुरव यांनी आपले दुकानी दीप लावून प्रार्थना केली. राजापूर तालुक्यातील फुपेरे येथील ग्रामदेवता श्री अंबाबाई व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरातही श्री. उदय सावंत यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ मंडळींनी सामूहिक रित्या दीप लावून प्रार्थना केली. पन्हळे गावातील ग्रामस्थांनी सामूहिकरित्या दीप लावले.

खेड तालुक्यातील श्री राधाकृष्ण मंदिरात तेथील ग्रामवासियांनी दीप लावून हिंदू राष्ट्र स्थापनेसाठीप्रार्थना केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE