जिल्हास्तरीय चित्रकला, हस्तकला स्पर्धेचे आयोजन

संगमेश्वर, दि. १३ : जे एस डब्ल्यु फाऊंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच जिल्हास्तरीय चित्रकला आणि हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांनी अधिकाधिक संख्येने विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन कलाध्यापक संघातर्फे करण्यात आले आहे .

सदर स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी – बारावी आणि खुला गट अशा चार गटात घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही. या स्पर्धेकरिता भरघोस बक्षिसे, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र विषय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाशिक्षकांजवळ संपर्क साधावा आणि स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे .

स्पर्धा चित्र आणि हस्तकलेच्या वस्तू बनवून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशालेत जमा कराव्यात. खुल्या गटाकरीता वयाची, शिक्षणाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ति खुल्या गटातून या स्पर्धेत भाग घेऊ शकते. जिल्ह्यातील सर्व कलाकारांच्या कलेला वाव मिळावा हा या स्पर्धेचा एक महत्वाचा उद्देश आहे. चित्र आणि हस्तकला वस्तू जमा करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ अशी आहे.

सहभागी होणाऱ्या शाळांनी आपल्या लेटरहेडवर सहभागी विद्यार्थ्यांच्या नावांची यादी , स्पर्धाचित्रे आणि हस्तकला वस्तू स्वरूपकुमार केळसकर ९४०४१५३४१३ , सुशीलकुमार कुंभार ७०७५८२६४०७ , उदय मांडे ९९२२२४८७५४ , इमतियाज शेख ९४२२९११११६ , राजन आयरे ९८२२३९५९९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE