


उरण दि. १४ (विठ्ठल ममताबादे ) : उरण मधील सर्वात पहिली फूटबॉल अकॅडेमी म्हणजे सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी उरण या संस्थेच्या तीन खेळाडूंनी फुटबॉल मध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
उरण मधील सेव्हन स्टार फुटबॉल संस्थेची स्थापना 2016 मध्ये उरण येथे झाली. या संस्थेने व संस्थेचा पालक वर्गाने मिळून फुटबॉलचे अनेक टूर्नामेन्ट भरवले, ज्याचा मध्ये महाराष्ट्राचा अनेक जिल्ह्यामधून संघ सहभागी झाले. ह्याच सेवेन स्टार फुटबॉल अकॅडेमी मधून अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत.जे आज अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या स्तरावर आपला खेळ दाखवत आहेत.
आता संस्थेच्या मार्फत उरण चे तीन खेळाडू शिव रोहन म्हात्रे वय 9 वर्ष हा सिंगापोर येथे झालेल्या सिंगा कप 2022 साठी त्याची मुंबई तुन निवड झाली असून त्याची निवड MFA मध्ये ही झाली. दुसरा पार्थ मांढरे वय 11 वर्ष ह्याची निवड MFA मध्ये झाली, तिसरी दिव्या नायक ह्या मुलीची निवड खेलो इंडिया मध्ये 17 वर्ष आतील मुलींचा टीम मध्ये रायगड मधून खेळण्यासाठी झाली आहे. शिव रोहन म्हात्रे हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामधुन् इतक्या कमी वयामध्ये इंटरनेशनल स्तरावर खेळणारा पहिला फुटबॉलपटू असावा असा सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी चे संस्थापक प्रवीण तोगरे यांनी सांगितले.उरणमध्ये चांगल्या प्रतीचे मैदान नसताना सुद्धा ही मुले मुली उरणच्या बाहेर पडून आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करून उरणचे नाव लौकिक करत आहेत या गोष्टींचा प्रत्येक उरणकराला अभिमान वाटावा असाच आहे.














