कोकण रेल्वे मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांना उद्यापासून जादा डबे


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखीन दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे जोडण्यात आले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांची संख्या वाढल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.


हापा -मडगाव (22908/2307) तसेच पोरबंदर- कोचुवेली (20910/20909) या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हापा – मडगाव एक्सप्रेसला दिनांक 16 नोव्हेंबर पासून तर पोरबंदर कोचिवली या गाडीच्या दिनांक 17 नोव्हेंबरच्या फेरीपासून स्लीपर प्रत्येकी श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE