महिलांसाठी आनंदयात्रा सुमधूर गीतांचा कार्यक्रम
रत्नागिरी : येथील वीर सावरकर नाटयगृहामध्ये महिलांसाठी मोफत आनंदयात्रा हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम रविवार दिनांक 20 -11-2022 रोजी
सकाळी 10 वाजता आयोजीत करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान स्वयंसिध्दा हा उपक्रम दरवर्षी मातृभूमी सेवा प्रतिष्ठान मार्फत राबविला जातो. डॉक्टर , पोलीस, शिक्षिका, सफाई कर्मचारी, बचतगट,पत्रकार उदयोजिका, समाजसेविका, आदर्श गृहिनी याव्दारे अनेक अडचणीवर मात
करून आपले अस्तित्व सिध्द करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो.
या उपक्रमामध्ये महिलांना विविध संधी व आव्हानावर कशी मात करायची यावर मार्गदर्शन केले जाते. उदयोगमंत्री व रायगड, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात येणार असुन त्यांची यशोगाथा ऐकता येणार आहे.
रत्नागिरीतील संगीतप्रेमी महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.














