पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला

पुणे : पाचवी-आठवीची पुढील वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला होणार आहे. परीक्षा परिषदेकडून परीक्षेच्या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, 15 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये पाचवी व आठवीला प्रवेश घेतलेल्या सरकारी, अनुदानित, खासगी, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.

दोन्ही इयत्तांसाठी चार पेपर असून, प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांची मिळून परीक्षा होणार आहे. ‘पेपर क्रमांक एक’मध्ये प्रथम भाषा 50 गुण, तर गणित 100 गुण अशा एकूण 150 गुणांचा पेपर असणार आहे. ‘पेपर क्रमांक दोन’मध्ये तृतीय भाषा 50 गुण आणि बुद्धीमत्ता चाचणी 100 गुणांसाठी असणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE