रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखीन दोन गाड्या विद्युत इंजिनसह धावणार आहेत. यामध्ये गांधीधाम ते तिरूनेलवेली दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पासून तर हापा मडगाव दरम्यान देणारे एक्सप्रेस गाडी 23 नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी गाड्या टप्प्याटप्प्याने विजेवर चालवले जात आहेत. यानुसार कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार आता दिनांक 21 नोव्हेंबरपासून गांधीधाम ते तिरूनेलवेली (20924/20923) तसेच हापा मडगाव (22908/22907) ही गाडी दिनांक 23 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे.















