मुंबईत भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचा उपक्रम
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२२: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या वैद्यकीय आघाडीने पत्रकारांसाठी मुंबईत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रख्यात मधुमेह तज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.अजित गोपछडे आणि आ.नितेश राणे उपस्थित होते. यावेळी डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी आरोग्याच्या दीक्षित पॅटर्न विषयी मार्गदर्शन केले.
















