सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आचार संहितेचे पालन करावे : सुनील पाटील

उरण दि. २६ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायततीची निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी होणार असून उरण तालुक्यातील वशेणी ग्रामपंचायतचे निवडणूक 18 डिसेंबर रोजी असल्याने गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मीटिंग श्री हनुमान मंदिर, वशेणी येथे मीटिंग संपन्न झाली.

या मिटींगला उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे स्वतः हजर राहून कार्यकर्त्यांना आचारसंहितेविषयी मार्गदर्शन केले. सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते, भावी उमेदवार मीटिंगसाठी उपस्थित होते.समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित कसे राहिल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असून आचार संहितेचे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी यावेळी केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE