देवरुख (सुरेश सप्रे) : देवरूख बाजारपेठेतील जून्याकाळातील प्रतिष्ठीत व्यापारी विजय राजाराम बेर्डे यांचे दि. २७ रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.

अनामिका जनरल स्टोअर्स चे मालक उदय बेर्डे यांचे ते वडील होत. त्याचे मागे मुलगा व मुली. नातवंडे असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वाजता बाजारपेठेतील घरातून निघणार आहे.
त्याचे निधनाने देवरूखातील दोनही व्यापारी संघटनेतर्फे अध्यक्ष बाबा सावंत व निखिल कोळवणकर.मोहन वनकर. नितिन हेगशेट्ये यांच्यासह सर्व व्यापारीवर्गाकडून शोक व्यक्त करून त्याना श्रध्दांजली वाहण्यात आली..














