देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख नगर पंचायतीने श्री सोळजाई मंदीर जवळच उभारलेल्या श्री देवी सोळजाई उद्यानाचा लोकार्पण सोहळा उद्या बुधवार दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ४:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.






या लोकार्पण सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन श्रीदेवी सोळजाई मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बापू गांधी, नगराध्यक्ष सौ. मृणाल शेट्ये, भारतीय जनता पार्टीेचे तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव. नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन विसपुते यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास शहरवासीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष वैभव कदम यांनी केले आहे.














