नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुमा शिरूर यांनी “पॅरा शूटिंग” या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.















