माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या स्मृतीस अभिवादन

उरण, (विठ्ठल ममताबादे ) : कोकणचे भाग्यविधाते,रायगडचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथील सुखःकर्ता निवास ऑफिस मध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांनाआदरांजली वाहून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, अंतुले यांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांची निर्णयक्षमता, त्यांचा दूरदृष्टीपणा व प्रशासनावरील पकड महाराष्ट्राला कायम लक्षात राहणारा आहे.त्यांचे जीवन कार्य सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.


यावेळी लोकनेते. दि. बा पाटील साहेब यांचे सुपुत्र अतुल पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, पनवेल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी, भरतशेठ गायकवाड, के डी कोळी, अरुण कोळी,अश्विन नाईक, रुकेश काठावले. व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE