देवरुख येथे ३ जानेवारीला जिल्हास्तरीय श्रीगणेश मूर्ती प्रदर्शन स्पर्धा


देवरूख (सुरेश सप्रे) : जिल्हातील मूर्तीकरांमध्ये स्नेहभाव वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने ३ जानेवारी २०२३ रोजी जिल्हास्तरीय श्रीगणेशमुर्ती प्रदर्शन स्पर्धा घेणे येणार आहेत.
संगमेश्वर तालुका मुर्तीकारांचा स्नेहमेळावा लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय देवरूख येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्ती कारणांना उत्तेजन मिळावे यासाठी रोहन बने (माजीअध्यक्ष जि.प.) व श्री गणेश मुर्तीकार संघटना संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्रीगणेशमुर्ती प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्नेहमेळाव्यात संघटनेच्या दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन रोहन बने यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटना अध्यक्ष आत्माराम हुमणे यानी दिली.

जिल्हास्तरीय श्री. गणेश मुर्ती प्रदर्शन स्पर्धेसाठी
प्रथम क्रमांक रू. ७७७७/- व चषक
द्वितीय क्रमांक रू ५५५५/- व चषक
तृतिय क्रमांक रू. ३३३३/- व चषक
उत्तेजनार्थ क्रमांक ५ रू.११११/- व चषक
अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी मुर्तीकाराना प्रशस्तीपत्रक देऊन गौरण्यात येणार आहे. मुर्तीकारानी आपली नाव नोंदणी आत्माराम हुमणे ९४२२९६५५०३ राजेंद्र जाधव ९४२३२९२९५३ गिरीश भोंदे ९८६०१९१५०० संदिप घडशी ९४०५०६८९८६ यांच्याकडे रू. २५१/- प्रवेश फी भरून दिनांक २५ डिसेंबरपर्यंत करावयाची आहे.शाडू मातीची हाती बनविलेली १८” ते २४” इंच उंचीची मुर्तीच स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार आहे. साच्यातील मुर्ती प्रदर्शनिय ग्राह्य धरली जाईल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE