पुण्यातील पर्यटक तरुणाचा दापोलीत समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी : मित्रांसह दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या तरुणावर बुडून मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी घडली. तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारी समुद्रात आंघोळ करत असताना ही घटना घडली.

या दुर्घटनेमध्ये बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मयूर चिखलकर असे आहे. तो पुण्यातील आयटी पार्क येथे कामाला होता. सुट्टी घालवण्यासाठी रविवारी तो दापोलीत पर्यटनासाठी इतर मित्रांसह आला होता. लाडघरच्या समुद्रकिनारी आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE