हुतात्म्यांना अभिवादन करून शिवसमर्थ परिवर्तन आघाडीने केली प्रचाराला सुरवात

उरण दि. 10 (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्याती 17 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 18 डिसेंबर 2022 रोजी होणार असून या निवडणूकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची बनली असून उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर रोजी असून त्या निवडणूकीचा प्रचाराचा शुभारंभ पागोटे गावातील हुतात्म्यांना अभिवादन करून झाला.

गावच्या सर्वागीण विकासासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शिव समर्थ परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे.गावच्या विकासासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. पागोटे ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या सरपंच पदासाठी शिव समर्थ परिवर्तन आघाडीचे कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी), वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार सुजित हसुराम तांडेल (निशाणी बॅट ), समृद्धी तुळशीराम तांडेल(निशाणी कपाट ), सतीश ज्ञानेश्वर पाटील (निशाणी ऑटोरिक्षा), तर वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार करिश्मा गणेश पाटील (निशाणी टेबल ), प्राजक्ता हेमंत पाटील (निशाणी बॅट), अधिराज किशोर पाटील (निशाणी कपाट), आणि वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार सोनाली दिनेश भोईर (निशाणी कपाट ), सुनिता विश्वनाथ पाटील (निशाणी- छताचा पंखा ), मयूर भालचंद्र पाटील (निशाणी बॅट) हे उमेदवार शिव समर्थ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. दिनांक 10/12/ 2022 रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मांना अभिवादन करून व 2 मिनीटे श्रद्धांजली वाहून हुतात्मांच्या कार्याचे स्मरण करून गावचा सर्वांगीण विकासाचा संकल्प करत सरपंच पदाचे उमेदवार कुणाल अरुण पाटील (निशाणी कपबशी) व इतर उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली.

यावेळी पागोटे गावातील सर्व उमेदवारांनी श्रीगणेश देवता, श्री हनुमान देवता , खंडोबा देवतेचे, देवीचे, गावातील कुल देवतेचे दर्शन घेतले. विविध बूथचे उदघाटन गावातील प्रतिष्ठीत नागरीक, जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रचाराच्या सुरवातीपासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासून गावातील ग्रामस्थांचा, नागरिकांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रचाराला व शिवसमर्थ आघाडीच्या उमेदवारांना उत्तम पाठिंबा मिळाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE