कलाशिक्षक टी. एस. पाटील यांच्या बाहुली नाट्याचा गौरव!

मुंबईतील कार्यक्रमात शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान

संगमेश्वर : सह्याद्रि शिक्षण संस्थेचे ,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सतीचे कलाशिक्षक टी . एस. पाटील यांची ‘बाहुली नाट्यातून आनंदाची शिक्षण व जीवन शिक्षण’ या उपक्रमाचे २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठी फेलोशिप साठी निवड झाली आहे . नुकतीच ही फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आली .

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटरच्या’ वतीने ‘शरद पवार इन्स्पायर ची सुरुवात २०२१ – २२ पासून करण्यात आली आहे. ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत फेलोशिपचे हे दुसरे वर्ष शिक्षण, कृषी, साहित्य या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग व उपक्रम करणाऱ्या गुणवंतांना प्रत्येकी ६०, ००० -/ हजार रुपये फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला जातो.

बाहुली नाट्यातून वेगवेगळे प्रयोग करून कृतीयुक्त ज्ञानरचनावादावर आधारित आनंददायी शिक्षण कशाप्रकारे देता येईल यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम हे राबवत असतात. तसेच या कलेचा प्रभावीपणे कोरोना जनजागृती, स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव ,व्यसनमुक्ती अभियान या विविध विषयांचे समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी केला आहे. दि.११ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे शरदचंद्र पवार , डॉ. सी डी माई , खासदार सुप्रिया सुळे व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पाटील टी. एस . यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली.

या फेलोशिप मधून तयार होणाऱ्या विविध उपक्रमांचा उपयोग संपूर्ण राज्यभर शिक्षण ,कृषी, साहित्य क्षेत्रात वापर केला जाणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम ,ज्येष्ठ संचालक मा. शांताराम खानविलकर ,सेक्रेटरी महेश महाडिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी , ज्येष्ठ चित्रकार – शिल्पकार प्रकाश राजेशिर्के , सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव , रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आणि कलाशिक्षक सदस्य , सती विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर ,उपमुख्याध्यापक अमर भाट , पर्यवेक्षक पांडुरंग काळुगडे ,पर्यवेक्षिका सौ . आसावरी राजेशिर्के तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक- ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रेरणादायी पुरस्कार
कलाशिक्षक म्हणून आपण ज्यावेळी अध्यापनासाठी सुरुवात केली त्याच दिवशी नियमित अभ्यासक्रमाबाहेरील शिक्षण देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निश्चय आपण घेतला होता . अत्यंत कमी खर्चात आणि प्रभावशील असे अध्यापन आणि उद्बोधन बाहुली नाट्यातून होते . यामुळे बाहुल्या तयार करणे आणि त्यातून विविध विषयांवर केलेले उद्बोधन हे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाचा अंतर्मनावर खूप खोलवर परिणाम करणारे ठरले . या माध्यमातूनच आपण गेली अनेक वर्षे कला अध्यापन सुरु ठेवले असून त्याचे अभिनंदनीय परिणाम समोर आले आहेत, आपण केलेले काम हे कोणत्याही पुरस्कारासाठी नव्हते तरीही यशवंतराव चव्हाण सेंटरची फेलोशिप मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे कलाशिक्षक टी एस पाटील यांनी सांगितले. सह्याद्री शिक्षण संस्था , ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव , रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी कलाशिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपल्याला हे यश मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.


Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE