श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुखतर्फ लेख, कथाकथन,वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

देवरूख( सुरेश सप्रे) : श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय देवरुखतर्फ विविध स्पर्धांचे आयोजन करणेत आले आहे
स्व.ल.वा.साने गुरुजी स्मृती खुली लेख स्पर्धा स्व.शालिनी व सदानंद बेंदरकर स्मृती खुली कथाकथन स्पर्धा स्व. शांता साने स्मृती खुली वक्तृत्व स्पर्धा अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत.

लेख स्पर्धेसाठीचा विषय :

  1. समाज माध्यमांचा (सोशल मीडिया )जनमानसावरील परिणाम. शब्द मर्यादा किमान बाराशे कमाल पंधराशे. लेख पाठविण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022. लेख वाचनालयाच्या कार्यालयात प्रत्यक्ष, पोस्टाने, कुरिअरने अथवा वाचनालयाच्या ta6409001@gmail. Com या ई-मेल वर पाठवता येईल. लेख शक्यतो युनिकोडमध्ये टाईप करून पाठवावा. विजेत्यांना ग्रंथ भेट आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
    कथा लेखन स्पर्धा :
    विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकाला आहे. शब्द मर्यादा 2000 ते 2500. विजेत्यांना ग्रंथ भेट आणि प्रमाणपत्र दिले जाईल. कथा वाचनालयात प्रत्यक्ष / पोस्ट/ कुरिअर ने किंवा वाचनालयाच्या
    ta 6409001@gmail. Com या ई-मेल वर पाठवता येईल. कथा शक्यतो युनिकोड मध्ये टाईप करून पाठवावी. कथा पाठविण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022.
    वक्तृत्व स्पर्धा :
    स्पर्धकाने पुढीलपैकी एका विषयावर किमान सात मिनिटे आणि कमाल नऊ मिनिटे बोलावयाचे आहे :
    अ ) समाज माध्यमांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई
    ब ) संस्कारांची विद्यापीठे हरवलीत कुठे ?
    बक्षिसे प्रथम 1000 द्वितीय 750 तृतीय 500
    वक्तृत्व स्पर्धा रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता वाचनालयाच्या सभागृहात सुरू होईल. स्पर्धकांनी आपली नावे जी के जोशी यांच्या 9423297358 या whatsapp नंबर वर नोंदवावीत.
    स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी 9423297358 / 7350482336 या नंबर वर संपर्क करावा.असे आवाहन वाचनालयातर्फे करणेत आले आहे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE