देवरुखमधील गणेश वेदपाठशाळेचा २६ डिसेंबरला रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

सोहळयानिमित्त २६ ते ३० डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम

देवरुख (सुरेश सप्रे) : देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळा या संस्थेचा २५ वा वर्धापनदिन सोहळा सोमवार दि. २६ डिसेंबर ते शुक्रवार दि. ३० डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमात सोमवार दि. २६ डिसेंबर ते शुक्रवार दि. ३० डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी ८.०० ते १२.३० या वेळेत "पंचायतन याग" होणार आहे.

ज्ञानरंजनात्मक कार्यक्रमात २६ रोजी सायं. ६ ते ८ रात्री वाजता निजसुरे वेदशाळा आंजर्ले स्मृती व्याख्यानमाला निधी अंतर्गत सौ.बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजता निजसुरे वेदशाळा आंजर्ले स्मृती व्याख्यानमाला निधी अंतर्गत शरद पोंक्षे, बोरीवली-मुंबई यांचे "श्रीमंत बाजीराव पेशवे" या विषयावर व्याख्यान, तर गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० श्रीधर पाटणकर, रत्नागिरी यांचे सुश्राव्य गायन, शुक्रवार दि. ३० डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते १२.०० वाजता वासुदेवबुवा जोशी, औदुंबर आणि महेशबुवा काणे, चिपळूण यांची कीर्तन जुगलबंदी होणार आहे.

सोमवार दि. २६ डिसेंबर ते गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी रोज रात्री ८.०० ते ९.०० या वेळात उपस्थित सर्वांसाठी भोजन प्रसाद आणि रात्री ९.०० ते १०.०० या वेळात आरती व भोवत्या आदी कार्यक्रम होणार आहेत.

या सर्व उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE