कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून ख्रिसमस विशेष गाड्या

पुणे-करमाळी, करमाळी-पनवेलसह लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणार

रत्नागिरी : हिवाळी हंगाम तसेच ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पुणे करमाळी, करमाळी येथे पनवेल तसेच मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.


हिवाळी हंगामात कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तसेच ख्रिसमस साठी गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर या विशेष गाड्या कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या सहकार्याने चालवण्यात येणार आहेत.
यातील पहिली विशेष गाडी (01445/01446) पुणे ते करमाळी मार्गावर दिनांक 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी पुणे जंक्शन येथून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी करमाळीला ती सकाळी साडेआठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी करमाळी येथून दिनांक 18 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत दर रविवारी धावणार आहे. ही गाडी गोव्यातील करमाळी येथून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी अकरा वाजून 35 मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रत्नागिरी आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी ही स्थानके घेत घेत करमाळीला विसरणार आहे.


दुसरी विशेष गाडी करमाळी ते पनवेल (01448/01447 मार्गावर दिनांक 17 डिसेंबर पासून 14 जानेवारी पर्यंत धावणार आहे.पनवेल ते करमाळी वरील कालावधीतच धावणार आहे. या दोन्ही एक्सप्रेस गाड्या 22 डब्यांच्या धावणार आहेत.


तिसरी विशेष गाडी (01459/01460) मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील कर्मवीर दरम्यान आठवड्यातून दोनदा धावणार आहे. ही गाडी 21 एलएच बी डब्यांची लावणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE