ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

देवरुख ( प्रतिनिधी ): पत्रकारीतेतील योगदानासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेतर्फे दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार संगमेश्वर येथील लोक निर्माणच प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना जाहीर झाला आहे.


दि. २७ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे संघटनेच्या अधिवेशनात जतिन देसाई व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ऑल जर्नlलिस्ट अँड फ़्रेंड सर्कल तर्फे राज्यातील विविध क्षेत्रlतील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. त्यामध्ये पत्रकार क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

या वर्षी पत्रकारांना देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना जाहीर झाल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल आणि केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांनी जाहीर केले आहे.


पत्रकार प्रेरणा पुरस्कार संगमेश्वरचे लोकनिर्माणचे पत्रकार सत्यवान विचारे यांना जाहीर झाल्याने संघटनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संदेश सप्रे, लोकनिर्माणचे बाळकृष्ण कासार. शिवसेना नेते राजू महाडीक. माजी सभापती सुजित महाडीक. आदींनी सत्यवान विचारे यांचे अभिनंदन केले आहे. विचारे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावं होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE