रायगड जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीत ४४ अर्ज प्राप्त

सेवानिवृत्ती प्रकरणांचा जलद गतीने तयार करणार : जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर

अलिबाग,दि.24 (जिमाका): विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि.23 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग या ठिकाणी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली होती. यात एकूण 44 अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी या पेन्शन अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वय साधला.


या जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीमध्ये जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयातील कार्यालयप्रमुख तसेच तक्रारदार पेन्शनधारक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विविध कार्यालयप्रमुख,कर्मचाऱ्यांना प्रलंबित पेन्शन प्रकरणांचा निपटारा त्वरीत करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय पेन्शन अदालतमध्ये एकूण 44अर्ज प्राप्त झाले असून त्यातील इतर जिल्हयांचे ५ अर्ज प्राप्त आहेत. त्यावरील आवश्यक कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे प्रशासनाने कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE