देवरूख ( चिंतामणी सप्रे ) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देणे जिकिरीचे असते.परंतु ताम्हाणे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या ताम्हने हायस्कूल चे शैक्षणिक व सामाजिक काम उल्लेखनीय असून कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी काढले.
ते हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक काका सप्रे. यदेव माने. नरेंद्र बोथले, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार.आंबवचे उप सरपंच बाळामाने. जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या जन्मदात्या आई नंतर दुसरी आई म्हणजे शाळा..
विद्यार्थी शिकून तो सद्रृढ झाला तर गाव सद्रृढ होतो. पुर्वी अशा संस्था उभ्या केल्या म्हणूनच आज आपण घडलो… हे लक्षात ठेवून संस्थेचे व शाळेचे हित जोपासत आपली शाळा हि आपली आहे.. हे विसरून न जाता नविन पिढीला आपण संस्कार व शिक्षण देवून उपकृत करून देशाचे चांगले नागरीक बनविणे साठी संस्था सदस्यसह विद्यार्थ्यांनी योगदान देवून आपली पंचक्रोशीचा व शाळेचा दर्जा कायम ठेवणेसाठी कटिबद्ध रहा. असा मौलिक सल्ला सदानंद चव्हाण यांनी देत संस्थेची अशीच प्रगती होत जावी अशा शुभेच्छा हि दिल्या
यावेळी विविध विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव माजी आम. सदानंद चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेच्यावतीने मा. सदानंद चव्हाण याचेसह उपस्थित मान्यवरांचा शाल. श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून संस्थाध्यक्ष काका सप्रे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्याक प्रभावळकर सर तर आभार नरेंद्र बोथले यांनी मानले.














