उर्फीच्या विकृतीची महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल घ्यायला हवी होती
दुटप्पी महिला आयोगाला चित्रा वाघ यांचा रोखठोक सवाल
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करणा-या उर्फी जावेदवर महिलांचा मान व सन्मान जपण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाने अद्याप स्वाधिकाराने दखल घेत कठोर कारवाई का केली नाही असा रोखठोक सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, प्रवक्ते गणेश हाके, नांदेड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष चित्ररेखा गोरे आदि उपस्थित होते. महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतली नसली तरी भाजपा उर्फीचा असा नंगानाच चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

श्रीमती वाघ म्हणाल्या की, उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणा-या महिला आयोगाने ट्वीटरवरील बातमीवरून मराठी वेबमालिका ‘अनुराधा’ च्या अश्लील पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेत तातडीने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली. मात्र आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते, हे अत्यंत दुर्दैवी आहे.यावरून आयोगाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते.














