शिक्षक मतदारांना शिक्षक मतदारांना मतदानासाठी ३० रोजी निमित्तिक रजा

नवी मुंबई :    कोकण विभागाची शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2022-23 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिक्षक मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदानाच्या दिवशी   दि. 30 जानेवारी,  2023 रोजी शिक्षक मतदारांना नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. 

या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग शिक्षक  मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार असून शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असून, ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा उप आयुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE