उरण (विठ्ठल ममताबादे ) : बेळगाव निवासी परमपुज्य आई श्री कलावतीदेवी यांचा पुण्यस्मरण उत्सव सोमवार दि 16 जानेवारी 2023 ते रविवार दि 22 जानेवारी 2023 दरम्यान श्री संगमेश्वर देवस्थान, देऊळवाडी उरण शहर येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
सकाळी 7 ते : 8.30 परमार्थमार्ग भाग – 1 ला प्रांतस्मरण व वाचन, दुपारी 4 ते 5:30 वा. परमार्थमार्गप्रदीप भाग 1 ला सायंस्मरण व वाचन, रात्री 8:30 ते 10 वा परमार्थमार्गप्रदिप भाग 2 गुरुपौर्णिमा वाचन, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी सिध्दकला भजन मंडळ उरणचे सर्व सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षाच्या 365 दिवस म्हणजेच वर्षाचे सर्वच दिवशी येथे भजन केले जाते. एकंदरित परमपूज्य आई श्री कलावतीदेवी यांचा पुण्यस्मरण उत्सव उत्साहात संपन्न झाला.















