दापोली : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जि. प. मराठी शाळा दमामे ता. दापोली येथे मराठी शाळा दमामे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीसाठी ५ वी ते ७ वीचतील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमात विद्यार्थीना उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत कृषी पर्यवेक्षक वाकवलीचे प्रकाश कुळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गावच्या सरपंच अर्पिता शिगवण, उपसरपंच गंगाराम हारावडे, शालेय व्यवसथापन कमिटीचे अध्यक्ष संतोष देवघरकर, प्रगतशील शेतकरी जानू जाधव, शाळेच्या मुखयाध्यापिका श्रीम सोनवलकर, शिक्षक श्री. राठोड , कृषी सहायक चंदा सावके व मोठ्या संख्येने विद्यार्थी
उपस्थित होते.

















