दापोली : दापोली तालुक्यात दमामे येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत प्रचार व प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली.
या निमित्त जनजागृती कार्यक्रमासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून पुढाकार घेण्यात आला. मराठी शाळा दमामे व न्यू इंग्लिश स्कूल दमामे येथे मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली व तसेच मराठी शाळा दमाने येथे चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच अर्पिता शिगवण, उपसरपंच गंगाराम हरावडे, ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक चंदा सावके, ग्रामस्थ व मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनवलकर, दोन्ही शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. यनिमित्ताने तसेच मुलांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्व व त्याची लागवड याविषयी कृषी सहाय्यक चंदा सावके यांनी दमामे, भडवळे परिसरातील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
















