रायगडावरील विकास कामांची जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून पाहणी

चवदार तळे येथे भेट देवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी महाड तालुक्यातील चवदार तळे येथे शुक्रवार, दि.27 जानेवारी रोजी भेट देऊन महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, सुधीर शेठ हे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी महाड प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय येथेही भेट दिली.


त्याचबरोबर रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या रायगड किल्ल्यावरील विविध विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी शनिवार, दि.28 जानेवारी रोजी पाहणी केली. या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे सपत्नीक दर्शनही घेतले.


यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सौ.स्वाती म्हसे-पाटील, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, कार्यकारी अभियंता महेश नामदे, सहाय्यक अभियंता श्री.स्वप्निल बुर्ले, रायगड विकास प्राधिकरणाचे श्री.वरुण भामरे आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE