रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्सप्रेस गाडीला एल एच बी लूक देण्यात आला आहे. याचबरोबर ही 15 डब्यांची असलेली ही गाडी आता सात डबे वाढवून 22 डब्यांची धावू लागली आहे. कोकण रेल्वे मार्गावर अप दिशेने धावताना ही गाडी ज्या दिवशी मुंबईला जाते त्याच दिवशी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघते.