ज्येष्ठ नागरिक मंडळाचे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरवात.उरण मध्ये मराठी नववर्षाचे स्वागत विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात केले जाते.याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक मंडळ उरणतर्फे सालाबाद प्रमाणे याहीवर्षा गुढी पाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोभा यात्रा उरण शहरात पेन्शनर्स पार्क येथून गणपती चौक, एन आय हायस्कूल मार्गे परत पेन्शनर्स पार्क या मार्गे काढण्यात येते.विविध सामाजिक संस्था संघटनेचा दरवर्षी शोभा यात्रेत मोठा सहभाग असतो.दिनांक 22 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वा. पेन्शनर्स पार्क, उरण शहर येथून या गुढी पाडवा शोभा यात्रेची सुरवात होणार आहे.

जास्तीत नागरिकांनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष हसमुख भिंडे (पालू भिंडे ), उपाध्यक्ष अरुण मोदी, सचिव उमेश नाईक आदींनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE