
रण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)- सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर, ता. उरण ,जि. रायगडतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळसुंदे व तुंगारतन विद्यालय, गुळसुंदे येथे जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला .
जागतिक चिमणी दिनानिमित्ताने चिमणीचे परिसंस्थेतील महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच चिमण्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून घरटी कशी करता येईल यासाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती .वेस्ट मधून बेस्ट या संकल्पनेतुन पुठ्ठ्याचे रोल,आईस्क्रीम स्टिक व कार्डबोर्ड ही साधने वापरून 62 घरट्यांचे वाटप फॉनच्या टीमने केले. प्रात्यक्षिक दाखवून फॉनच्या टीमने विद्यार्थ्यांकडून घरटी बनवून घेतली.
या कार्यशाळेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर,जितेंद्र घरत,प्रथमेश मोकल,प्रणव गावंड, युवराज शर्मा व निसर्गमित्र दिनेश चिरनेरकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी ही या कार्यशाळेचा आनंद घेतला.निसर्गविषयक प्रश्नमंजुषा ह्या विषयातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.जो विदयार्थी -विद्यार्थिनी प्रश्नाचे उत्तर देईल त्याला एक घरटं विशेष भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता रा. जि. प. शाळा गूळसुंदेच्या वेदांती महाले व तुंगारतन विद्यालयाचे कांबळे सर व इतर शिक्षक वृंद तसेच कर्नाळा पक्षी अभयारण्याचे शंकर पवार (भाऊसाहेब), संतोष म्हात्रे (भाऊसाहेब),वनरक्षक संतोष राठोडयांचे सहकार्य लाभले.
