सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

रत्नागिरी : महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली येथे ही महिला कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सांगलीतील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.


सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या. अंतिम सामन्यात तुंग (जि.सांगली) येथील बागडी आणि पाटील यांच्यात लढत झाली. सायंकाळी ही अंतिम लढत सुरू झाली. या अंतिम सामन्यात बागडी व पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करीत चार विरुध्द दहा गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE