रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब आणि भारतीय जनता पार्टी शाखा कुवारबाव आयोजित भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आणि कबड्डी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यानुसार कबड्डीमध्ये महिलांमध्ये गावखडीच्या सोमेश्वर तर पुरुष कबड्डी गटात कोतवडे येथील चॅलेंजर कबड्डी संघाने अजिंक्य पटपटकावले.
अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा निकाल
उत्कृष्ठ फलंदाज :- निशांत कसबेकर
उत्कृष्ठ गोलंदाज :- ऋषी भोंडे
मालिका वीर :- सोहम भाटकर
विजेता संघ :- ऑल सोमेश्वर
उपविजयी संघ :- जय भैरी श्रीनगर
कबड्डी स्पर्धांचा निकाल ( महिला )
उत्कृष्ट चढाई :- दीपा कांबळी
उत्कृष्ट पकड :- वेदिका भाटकर
अष्टपैलू खेळाडू :- सानिका मांडवकर
विजेता संघ :- सोमेश्वर गावखडी
उपविजेता संघ :- ओमसाई चिंचखरी
कबड्डी स्पर्धांचा निकाल ( पुरुष )
उत्कृष्ट चढाई :- अविनाश पालये ( चालेंजर )
उत्कृष्ट पकड :- नंदू सावंत ( महापुरुष )
अष्टपैलू खेळाडू :- विशाल पवार ( चालेंजर )
विजेता संघ :- चालेंजर कोतवडे
उपविजेता संघ :- महापुरुष पोलीस
कुवारबाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

















