शहीद सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव दुपारपर्यंत रत्नागिरी विमानतळावर

 

रत्नागिरी : भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव आज (सोमवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत रत्नागिरी विमानतळ येथे पोहोचणे अपेक्षित असून या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक मानवंदना देणार आहेत. विमानतळावरून सुभेदार ढगळे यांच्या चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावी पार्थिव नेण्यात येणार आहे.

भारत- चिन सीमेवर रस्ता बनविण्यासाठि जागेची रेकी करण्यासाठी गेलेले मोरवणे गावचे सुपुत्र व माजी सैनिकि मुलांचे वसतीगृह चिपळूणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


सततच्या पावसामुळे बर्फवृष्टिमुळे दि. २४ मार्च रोजी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. सुभेदार अजय ढगळे व त्यांच्याबरोबर असलेल्या टिमला काही समजण्याच्या अगोदरच ते मातीच्या व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते. दुर्घटनेनंतर सहा दिवस भारतीय सेना त्याना शोधण्यासाठि अथक प्रयत्न करत होती.

अखेर भारतीय सेनेच्या जांबाज बहादुर सैनिकांनी भल्या मोठ्या चिखल दगड बर्फाखाली असलेल्या बहादुर शहिद सुभेदार अजय ढगळे व त्यांच्या बहादुर टिमला आपल्या प्राणांची बाजी लाऊन शोधुन काढले.


शहिद अजय ढगळे हे कारगिल या आधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE