दिलासादायक!! सध्याचा कोरोना संसर्ग कमी घातक : तज्ञांचं मत

नवी दिल्ली : कोरोना वेगाने पसरत असला तरी पूर्वीप्रमाणे चिंतेचे कारण नाही. कारण, तज्ज्ञांच्या मते या वेळचा संसर्ग खूपच कमकुवत आहे. बाधा झाल्यानंतर रुग्ण जास्तीत जास्त दोन दिवस आजारी पडतो. हा संसर्ग आता सामान्य विषाणूजन्य तापापेक्षाही कमी घातक झाला आहे. आजारी पडणाऱ्या ५ टक्के रुग्णांमध्ये ताप सामान्य आहे. परंतु ज्यांना आधीच गंभीर आजार आहे, त्यांनी सावध राहण्याची गरज आहे, असं मत तज्ञांनी नोंदवलं आहे.


नवीन लाटेचा धोका नाही
आता नव्या लाटेसारखा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, ओमायक्रॉनच्याच उपप्रकारामुळे संसर्ग पसरत आहे. कोरोना निःसंशयपणे वेगाने पसरत आहे; परंतु रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली नाही. भविष्यातही अशी भीती नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. आयएमए म्हटले की, लोकांनी घाबरून जाऊ नये.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE