नागरिकांची पाण्यासाठी वणवण
खेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या पाणी साठवण टाकीजवळील विद्युत रोहित्र कोसळल्यामुळे काल खेड शहराचा पाणीपुरवठा बंद होता. नगर पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे ऐन उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टाकीजवळ असणारे रोहित्र गांजल्यामुळे काल दुपारी कोसळल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरल्या नाहीत. त्यामुळे दिवसभर खेड शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. एका टँकरच्या साहाय्याने खेड शहरातील काही भागात पाणी पुरवठा केला जात होता.















