जिल्हास्तरीय ओपन तायक्वांडो चॅम्पियनशिपसाठी संगमेश्वर संघाची घोषणा

देवरूख (सुरेश सप्रे) : रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ दापोली आयोजित 16 वि क्युरोगी व 10 वि पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सन 2023 सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह नवछात्रालय शिवाजी नगर दापोली या ठिकाणी दि. 25 ते 27 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी,लांजा, राजापूर, चिपळूण,खेड,दापोली, मंडणगड,गुहागर, तालुक्यांमधून सुमारे 400 खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्याच्या संघाची निवड करणेत आली.

या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, पी.एस.बने तायक्वांडो क्लब, निवे तायक्वांडो क्लब, लायन्स तायक्वांडो क्लब, या सर्व क्लबचे खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.सुभाष बने, आमदार शेखर निकम, रोहन बने, स्मिता लाड. पूनम जाधव. उपनगराध्यक्ष वैभव पवार, आदींनी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE