रायगड रोप-वे च्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम

राष्ट्रीय -राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व रायगड रोप-वे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

अलिबाग : रायगड रोप-वे, पाचाड, ता.महाड येथे संभाव्य दुर्घटना झाल्यास त्या ठिकाणी बचाव कार्य कशा पध्दतीने करावे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.योगशे म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्दश्री बैनाडे यांच्या पुढाकारातून तसेच महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्या नियोजनातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड व रायगड रोप-वे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम आज (दि.28 एप्रिल 2023) रोजी सकाळी 7 ते 10 या कालावधीमध्ये संपन्न झाली.


या आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीममध्ये एनडीआरएफ चे डेप्युटी कमांडट दिपक तिवारी, असिस्टंट कमांडट निखिल मुधोळकर व त्यांचे 25 अधिकारी व जवान, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), नागपूरचे श्री.बादल व त्यांचे 4 अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), धुळे चे श्री.मनोज परिहार व त्यांचे 3 अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, नायब तहसिलदार अरविंद घेमूड, नागरी संरक्षण दलाचे एम.के.म्हात्रे, पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल, दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जागृती कांबळे, डॉ.ऋषिकेश कुद्रीमोती, महाड अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश पाटील, एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रविण घोलप व कर्मचारी रायगड रोप-वे चे अध्यक्ष राजेंद्र जोग, संचालक देवदत्त चंदावरकर, व्यवस्थापकीय संचालक वैशाली जोग, व्यवस्थापक नरेंद्र भालेराव, उपाध्यक्ष भालचंद्र बडे, 108 रुग्णवाहिका व त्यांचे पथक, आपत्ती व्यवस्थापनातील स्वयंसेवी संस्था, सिस्केप, चिंतन वैष्णव व सहकारी, आपदा मित्र सुरेश पाटील, अमिताभ जाधव स्वप्नाली शिर्के, अर्णव दर्शन, श्रध्दा जोशी इतर स्वयंसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE