जेएनपीए दि २ (विठ्ठल ममताबादे ) पाच ते पंधरा वयोगटातील १३ जणांना घेऊन कोमना देवी मंदिर सारडे येथे फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) तर्फे बच्चे कंपनीची निसर्ग शाळा भरविण्यात आली.
या निसर्ग शाळेत या मुलांना अगदी थोडक्यात सापांची ओळख, टीव्ही सिरियल किंवा चित्रपट यामध्ये सापांबद्दल गैरसमज कसे पसरविले जातात, निसर्गाचे महत्व, कचरा व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात आली.जंगले नष्ट झाली तर भविष्यात कोणते धोके निर्माण होतील याची सर्व जाणीव या बच्चे कंपनीला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नुसते घरी टीव्ही आणि कॉम्प्युटर समोर बसून त्यांना होमसिक करण्यापेक्षा त्यांच्या मोठ्या पिढीने काय काय मज्जा केली त्यावेळी मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध नसताना त्यांनी कोणकोणते खेळ खेळले. जंगलातील कोणकोणती हंगामी फळे कोणकोणत्या वेळेस उपलब्ध असतात. जंगलात गेल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी.परीसरात काय काय जैवविविधता आहे.त्याची ओळख व नोंद कशी करावी. आपण आपल्या कुटुंबियांसमवेत कुठेही बाहेर गेल्यावर आपला कचरा आपण व्यवस्थित ठिकाणी टाकून त्या परिसराच्या स्वच्छतेत आपली जबाबदारी ह्याची जाणीव त्यांना ह्याच वयात झाली तर पुढे जाऊन हीच मुले जबाबदार नागरिक बनतील.हा दृष्टीकोन या उपक्रमा मागे होता.यावेळी उरण तालुक्यातील वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थी व फॉन संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी मुलांना संस्थेचे सचिव शेखर अंकुश म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले.