साडवली : नऊ गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करणार्या उमरे धरणाचा जलसाठा अतिशय कमी झाला असून जेमतें ८ ते १० दिवस पुरेल एवढेच पाणी धरणामध्ये शिल्लक आहे. पाण्याचा विसर्ग झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी कमी झाल्याने या धरणातील गाळ उपसा केल्यास पुढील वर्षी हि समस्या निर्माण होणार नाही. तसेच लिकेजचे काम केल्यास पुढील वर्षी पाणी टिकुन राहिल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या समस्या संदर्भात संदेश जिमन यांनी संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांना निवेदन देवून ही बाब निदर्शनास आणुन दिली आहे. पाणी पुरवठा बंद झाल्यास या गावांना शासनाच्या टॅंकरवर अवलंबुन रहावे लागणार आहे.
सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाढीव दराने ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत. हा संपुर्ण मे महिना पाण्याविना कसा काढायचा असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत..















