नावीन्यपूर्ण उपक्रम व योजनांमधून सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री उदय सामंत


अलिबाग : जिल्ह्यातील नागरिकांना गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री रायगड ना.श्री.उदय सामंत यांनी येथे केले.


अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे 01 मे, महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री रायगड ना. श्री.उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.योगश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सत्यजित बडे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी तथा वरिष्ठ संचालक (माहिती तंत्रज्ञान (IT) चिंतामणी मिश्रा, सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सचिन इंगळी, अलिबाग भूमी अभिलेख उपअधीक्षक श्री.जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैदयकीय अधिकारी डॉ.शितल जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा पशुविकास अधिकारी डॉ.श्यामराव कदम, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी . एस. हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, सतिश कदम, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीमती सूवर्णा पत्की तसेच अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते.


आपल्या भाषणाच्या सुरुवातीस जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देवून तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या सर्वांचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील आजचा दिवस महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे जागतिक कामगार दिन आनंदाने, उत्साहाने साजरा करीत आहोत. परंतु ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहत आहोत ते हुतात्मे व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रत्येक लढवय्यांच्या महाराष्ट्रात आपण राहतो, हे आपले मोठे भाग्य आहे, असे मी समजतो.
रायगड जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. यात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचेही योगदान महत्वाचे आहे.
जिल्हयात विकासाला गती देण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला 320 कोटी रुपये इतका निधी शंभर टक्के खर्च करून आपला रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे.
जिल्हयात कृषी,मत्स्यव्यवसाय, उद्योग तसेच पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि दुसरीकडे जिल्ह्याचा औद्योगिक विकास असे संतुलन साधत आपण ही विकासगंगा “निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान” या ध्येयाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेत आहोत.
सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन करून श्री.सामंत म्हणाले, गड-किल्ले, अभयारण्ये, समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवरील पायाभूत सोयी सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
वातावरणीय बदल, चक्रीवादळे होणे, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भू-सख्खलन अशा विविध घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे काम जिल्ह्यात उत्तम होण्यासाठी महसूल व पोलीस विभागासह संबंधित सर्व विभागांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
ते म्हणाले, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख नूतनीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व भूमी अभिलेख कार्यालयाकडील 16 लाख 56 हजार 257 पानांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. मूळ भूमापन नकाशांचे एकूण 13 प्रकारच्या नकाशा अभिलेखांच्या 2 लाख 14 हजार 791 शिटचे 22 लाख 5 हजार 155 पॉलिगॉनचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य योजना, समग्र शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र 3 हजार 89 शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वी चे 1 लाख 10 हजार 51 विद्यार्थी व इयत्ता 6 वी ते 8 वी चे 71 हजार 155 लाभार्थी लाभ घेत आहेत.


जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार इतक्या गुराढोरांचे 100 टक्के लसीकरण करण्यात आले. “माझा गोठा स्वच्छ गोठा” ही मोहीम प्रत्येक गोठ्यात यशस्वीपणे राबविण्यात आली, याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे अभिनंदन करून श्री.सामंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यमक्रमांतर्गत सन 2022-23 करिता जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयास 560 चे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकेकडे शिफारस केलेली एकूण प्रकरणे 994 होती. त्यापैकी 175 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत 837 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. तर 710 उमेदवारांचे मूल्यांकन झाले आहे.
पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत ऑफलाईन 4 व ऑनलाईन 12 असे एकूण 16 मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात एकूण 61 उद्योजक सहभागी झाले होते. यासाठी 1 हजार 57 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 33 उमेदवारांची अंतिम निवड तर 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत एकूण अर्जदार संख्या 224 होती, त्यापैकी लाभार्थी संख्या 171 आहे.
आज दि.01 मे 2023, महाराष्ट्र दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” चे उद्घाटन तथा लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत लवकरात लवकर उभी राहील याकरिता आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत,असे सांगितले. तसेच जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी या “आपला दवाखाना” या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
“हर घर जल” योजनेंतर्गत जिल्ह्यातील 90 गावे “हर घर जल” घोषित करण्यात आली आहेत. वैयक्तिक शौचालय कामास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी या स्वच्छता उपक्रमांना उत्स्फूर्त लोकसहभाग द्यावा त्याचबरोबर पाऊस पाणी संकलन व पाणी बचतीसाठी नागरिक व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृतीशील सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी जिल्हावासियांना केले.
जिल्ह्यात गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र, कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनाही याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्य शासनाने राज्यातील नागरिकांना माफक दरात सहज-सुलभ पद्धतीने वाळू उपलब्ध व्हावी, याकरिता आजपासून सुधारित वाळू धोरणाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात आपल्या जिल्ह्यातही सुधारित वाळू धोरण नियमित राबविण्यास सुरुवात होईल,असे त्यांनी जाहीर केले.
350 वा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी तारखेप्रमाणे व तिथीप्रमाणे किल्ले रायगड येथे मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. या दृष्टीने या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वाना जाहीर निमंत्रण दिले.
विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून कायम असेल. यासाठी आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लाभेल, अशी आशा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पोलीस बँड पथकाकडून राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.


पालकमंत्री श्री.सामंत यांनी उघड्या जीपमधून संचलनात सहभागी पथकांचे निरीक्षण केल्यानंतर पोलीस दल, होमगार्ड पथकांनी दिमाखदार संचलन केले. या पथकांचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी केले तर त्यांना संचलन उपप्रमुख म्हणून पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी उत्तम साथ दिली.
रायगड पोलीस विभागास मिळाली 11 नवी वाहने
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून रायगड पोलीस विभागास 11 नवी वाहने सुपूर्द करण्यात आली.

सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी “आपला दवाखाना” चे लोकार्पण
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” चे अलिबाग येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
उत्कृष्ट शासकीय सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
उत्कृष्ट शासकीय सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यांची नावे पुढीलप्रमाणे:-
पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह 2022- आंतरिक सेवा सुरक्षा पदक पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश भानुदास कावळे
महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह:- 1)परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल राजेंद्र शिर्के 2) सहायक फौजदार दिपक विष्णू मोरे 3) सचिन दत्तात्रेय वाणी 4) दत्ता तुकाराम श्रीवर्धनकर 5) अंकुश सखाराम जाधव 6) महिला पोलीस हवालदार जागृती सचिन पाटील
7) पोलीस हवालदार परेश विलास म्हात्रे 8) अरुण बाळकृष्ण घरत 9) प्रतिक सुभाष सावंत
लघुउद्योजकांना जिल्हा पुरस्कार-2022– 1) मे. विक्रम एंटरप्रायझेस, प्रोप्रा.सौ.पल्लवी मंदार जोशी, 45 पुतुबाईचा पाडा, बामणगाव, ता. अलिबाग, जि. रायगड (प्रथम पारितोषिक – सन्मानचिन्ह व रोख रक्कम)
2) मे.पी.के.फॉईल्स, प्रोप्रा. श्री. अनिल लक्ष्मण खालापूरकर, प्लॉट नं.30, आर्कोस इंडस्ट्रीयल इस्टेट, ढेकू, ता.खालापूर, (द्वितीय पारितोषिक- सन्मानचिन्ह व रोख रक्कम)
सरळ सेवा भरती सन-2021अंतर्गत भूमी अभिलेख विभागातील उमेद्वारांना पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
1) श्री. मनोज दशरथ गलांडे, कामोठे, ता. पनवेल 2) श्रीम. मनाली मनोहर म्हसे, खोपोली, ता. खालापूर 3) श्री. विराज जालिंदर खैरे, नांदगाव, ता. सुधागड 4) श्री. प्रणित नवनाथ भोसले, नागोठणे बेन्स, ता. पेण 5) श्री. संपत भगवान माने, करंजाडे, ता. पनवेल 6) श्रीम. नेहा विलास काळे, कामोठे, ता. पनवेल 7) श्री. सौरभ संभाजी नाईक, कुंभारआळी, ता. पेण
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-3 मधील जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील पदांवर नामनिर्देशनाने नियुक्ती-
1) डॉ.विजय पांडूरंग मस्कर वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय, कर्जत, रायगड
2) डॉ.रोहन रविंद्र चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, रोहा, रायगड
तर श्रीम.संगिता शिवराम धुळे यांना अनुकंपा योजनेद्वारे पनवेल तहसिल कार्यालय येथे शिपाई या पदावर नियुक्ती देण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE