संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेडला थांबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या समर स्पेशल गाड्यांमधील रत्नागिरी ते पुणे मार्गावर धावणारी अनारक्षित गाडी शनिवारी दुपारी १ वाजता पुण्यासाठी सुटणार आहे.

गाडी क्र. 01132 रत्नागिरी – पुणे जं. अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून दर शनिवारी 06/05/2023 पासून सुरु झाली आहे. आता दि.13 मे 2023, 20 मे 2023 आणि 27 मे 2023 रोजी 13:00 वाजता सुटून पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:55 वाजता पोहोचेल. ही गाडी संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा,पनवेल, कल्याण, लोणावळा ही स्थानके घेत पुण्याला जाणार आहे.
संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार lगाडी क्र. ०११३१ पुणे जं. – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून दि. 18/05/2023 आणि 25/05/2023 रोजी म्हणजे दर गुरुवारी 20:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबणार आहे.
या गाडीला एकूण 22 डबे असतील. यात सामान्य – 20 कोच, SLR – 02 या प्रमाणे कोचरचना असेल.
