लांजा : लांजातील राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लांजातील सेनेच्या शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केला लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य खरेदी विक्री संघाचे सदस्य श्री. गणेश लाखण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लांज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत हयांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, लांजा नगरपंचायत नगराध्यक्ष मनोहर बाईत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माजी नगराध्यक्ष श्री राजू कुरूप,संजय तेंडुलकर, सचिन डोंगरकर उपस्थित होते. लांजा शहरात ठाकरे गटाला जोरदार हादरा बसला आहे काही दिवसात अनेक विध्यमांन सरपंच यांचा ही प्रवेश होणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले
