देवरूख : निवधे गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कट्टीबद्ध आहे. आपले अनेक वर्षाचे पुलाचे व रस्त्याचे स्वप्न मार्गी लावत पुर्णत्वास जात असल्याने आपल्याला मनातील आनंद पाहून व माझा केलेला सत्कार कायम आठवणीत राहील. असेच माझ्यापाठी कायम राहालच असा विश्वास आ. शेखर निकमसरांनी व्यक्त केला..
निवधे गावातील अनेक वर्षाच्या रखडलेल्या पूल व रस्त्याचे काम मार्गी लावलेबद्दल श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, मुंबई व गुरववाडी ग्रामस्थ. निवधे या मंडळाच्यावतीने आम. शेखर निकम यांचा भव्य सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला रविंद्र गुरव, रामचंद्र गुरव. रूपेश सावंत. शांताराम कोलापटे,अनंत गुरव. मुरादपुरचे उप सरपंच मंगेश बांडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल मंदीर वर्धापन दिनानिमित्त मंदीरात कलश पूजन.अभिषेक. पूजा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ. व श्री सत्यनारायणाची महापूजासह लहान मुलांचे विविध कार्यक्रम. भजन. व विविध मान्यवरांचे सत्कार करणेत आले. तर रात्रौ अष्टविनायक नाच व नमन मंडळ तळवडे-देवरुख यांचे झांजगी नमन असे कार्यक्रम सपंन्न झाले.

