अवघ्या १८० रुपयात मुंबई ते रत्नागिरी! शेकडो तिकिटे उपलब्ध असलेली विशेष ट्रेन उद्या धावणार!

मुंबई-रत्नागिरी तिकीट अवघे 180 रुपये

मुंबई -खेड 130 तर मुंबई- चिपळूण प्रवास अवघ्या 145 रुपयात!

पारदर्शक विस्टाडोम कोचची सफर अनुभवता येणार

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वनवे स्पेशल ट्रेन दिनांक 9 जून रोजी धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांना आरक्षण मिळणे अवघड झालेले असताना उद्या शुक्रवारी पहाटे मुंबईतून रत्नागिरी- मडगावकडे येणाऱ्या या गाडीची शेकडो तिकिटे अवेलेबल आहेत. विशेष म्हणजे जेवढ्या प्रवासासाठी खासगी बसेसना हजार ते बाराशे रुपये मोजावे लागतायत तोच मुंबई ते रत्नागिरी प्रवास या गाडीने अवघ्या 180 रुपयात करता येणार आहे. पहाटे ५.३० वाजता ही गाडी मुंबईतील सीएसएमटीवरून सुटून दुपारी बारा वाजून 29 मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचेल

गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ट्रेन
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ही एक दिशा मार्ग गाडी शुक्रवार, 09 जून 2023 रोजी मुंबई CSMT येथून 05:30 वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

या गाडीला एकूण 16 एलएचबी कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम: 01 कोच, एसी चेअर कार: 03 कोच, सेकंड सीटिंग : 10 कोच, एसएलआर – 01. जनरेटर कार: 01.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE