मडगाव : मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. 15 जून रोजी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 15 जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरू होणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या मडगाव ते कुमठा सेकशनमधून धावणारी 06602 मंगळुरु सेंट्रल ते मडगाव जंक्शन विशेष गाडी कुमटा स्थानकापर्यंत धावेल. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कुमटा ते मडगाव स्थानकादरम्यान ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर गाडी क्रमांक 06601 मडगाव -मंगळुरु जंक्शन या गाडीचा प्रवास कुमट्यापासून सुरू होणार आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे
